Hurry Up !!! Admissions are open for 1st To 10th (Semi English) And 11th to 12th (Vocational Computer Science & Crop Science) academic year 2019-20

About Us

Welcome to Education

२० जून २००७ मध्ये विश्वसेवा विद्यामंदिर ने आपला प्रवास सुरू केला. आमच्या शाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, मानसिक व शारीरिक विकास हाच आमचा ध्यास आहे.

विश्वसेवा पब्लिक स्कूल

विश्वसेवा विद्यामंदिर

जिजामाता माध्यमिक विद्यालय

विश्वसेवा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स

सैनिकी पॅटर्न निवासी व अनिवासी शाळा

विश्वसेवा एक परिपूर्ण निवासी संकुल

संस्कार

विद्यार्थ्यांची विचार व कृती चांगली होण्यासाठी संस्कारांची गरज असते. संस्कार मानवता, आदर, शिस्त आणि अखंडता यांचा समावेश आहे. आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी आम्ही त्यांच्यावर चांगले संस्कार करतो.

स्वावलंबन

यशस्वी माणूस स्वतःच्या प्रगतीसाठी इतरांवर कधीच अवलंबून राहत नाही. तो केवळ स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवत असतो. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो.

शिस्त

प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती अपूर्ण होते. शिक्षणाद्वारे चांगली वागणूक अमलात आणणे म्हणजेच शिस्त होय. त्यासाठी लहानपणीच शिस्तीचे संस्कार बालमनावर रुजवायला हवेत.

विभाग

 • सांस्कृतिक विभाग

  मानवाच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास म्हणजेच शिक्षण. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुण विकसित करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्याचे काम सांस्कृतिक विभागामार्फत नेहमीच करण्यात येते. दरवर्षी सांस्कृतिक विभागाच्या मार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

 • विज्ञान व तंत्रज्ञान विभाग

  विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा व वैज्ञानिक कुतूहल निर्माण होण्यासाठी २८ फेब्रुवारी या दिवशी दरवर्षी विद्यालय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येते. वारंवार विज्ञान प्रश्नमंजुषा घेण्यात येते. दररोजच्या परिपाठामध्ये विज्ञानवार्ता वाचण्यात येते. तसेच प्रयोगशाळेमध्ये विविध प्रयोग साहित्याची ओळख करून देण्यात येते. त्याचबरोबर कॉम्प्युटरवर माहिती देऊन त्यावर अभ्यासासंदर्भात व्हिडिओ दाखविण्यात येतात. स्क्रीन, प्रोजेक्टर, संगणक अशा विविध उपकरणांनी समृद्ध डिजिटल लॅब उपलब्ध आहे.

 • क्रीडा विभाग

  गरुडाच्या गगन भरारीप्रमाणे अत्योच्च यश गाठण्यासाठी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना खास तज्ञ मार्गदर्शकांकडून तंत्रशुद्ध मार्गदर्शन दिले जाते. या सर्व खेळामध्ये आमच्या शाळेतील खेळाडूंनी तालुका, जिल्हा व राज्यस्तरापर्यंत मजल मारून घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना खास तज्ञ मार्गदर्शकांकडून धनुर्विद्या, मल्लखांब, कुस्ती कराटे, तायक्कादों, वुशू , बॉक्सिंग व शिवकालीन मर्दानी खेळाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते.

 • सहल विभाग

  शालेय जीवनात पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभव घेणे अत्यंत फायदेशीर असते. म्हणूनच आमच्या शैक्षणिक संस्थेची वार्षिक सहल दरवर्षी जात असते. गेल्या दहा वर्षामध्ये प्रत्येक वर्षी शैक्षणिक सहल हा उपक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत आजअखेर अनेक ठिकाणांना भेटी दिल्या जातात.

आरंभ शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा

              निवासी शाळेची गरज का?

पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी

जीवनातील शिस्तीचे महत्व समजण्यासाठी

पाल्यास आत्मनिर्भर बनवण्यासाठी


वेळेचे महत्व जाणून घेण्यासाठी

संस्कारक्षम पाल्य तयार होण्यासाठी

सुदृढ आरोग्य प्राप्त होण्यास व्यायामाचे महत्व जाणून घेण्यासाठी

शाळेची वैशिष्ट्ये

 • निसर्गरम्य शालेय व वसतिगृह परिसर.
 • महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम.
 • तज्ञ् मार्गदर्शकांकडून तयारी.
 • विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव.
 • संगीत, नृत्य, गायन व आधुनिकतेबरोबरच सांस्कृतिक प्रकल्प.
 • विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व नैतिक गुणांचा विकास.
 • विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढीसाठी विविध प्रकल्प.
 • विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन, प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण.
 • सुसज्ज संगणक कक्ष, प्रयोगशाळा व ग्रंथालय.
 • अनुभवी, तज्ञ् व प्रशिक्षित शिक्षक वृंद.
 • सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी (स्कॉलरशिप ५ वी व ८ वी, चित्रकला ग्रेड इ. परीक्षांची)
 • खेळाचे प्रशस्त मैदान, योगासन, एरोबिक्स, सांघिक व वैयक्तिक खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण.